मुंबई, ठाण्यासह ‘इथे’ होणार मुसळधार पाऊस; राज्यभर रेड अलर्ट, हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

मुंबई :

देशाच्या काही भागात पावसाने हाहाकार केला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जीवितहानी घडल्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मौसमी आणि अति पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंत पिक लागण होणे गरजेचे होते मात्र कधीही बरसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणची पिके लागण शेतकऱ्यांनी थांबवली आहे.

उत्तर कोकणासह मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. तर उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज 15 ऑक्टोबरला रेड अर्लटसह अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वादळी-वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडू शकतो. बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर पुण्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबईमध्ये रात्री सतत पाऊस सुरू असल्याने दादर हिंदमाता परिसरात ठिकठिकाणी पाणी तुंबलं आहे. वसई-विरार नालासोपाऱ्यात रात्रभर रिमझिम पाऊस सुरू आहे. साउथ मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सातारा, सांगलीमध्ये पावसाचा जोर कायम आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आजही राज्यात असात मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here