‘इतक्या’ दिवसानंतर दुसऱ्यांदा होऊ शकतो करोना; ICMRने दिली अत्यंत महत्वाची माहिती

मुंबई :

कोरोनाने देशभरात थैमान घातलं आहे. जगभरातील लोकांचं लक्ष लसीकडे लागलेलं आहे. अशातच काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर बनलेली आहे. अशातच भारतातही ३ लोकांना कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. ICMR चे प्रमुख बलराम भार्गव यांनी सांगितले की, भारतात करोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी १०० दिवस निश्चित करण्यात आला आहे. देशात दुसऱ्यांदा संसर्ग झालेले तीन रुग्ण आढळून आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतात करोनाच्या पुनर्संसर्गासाठी १०० दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी म्हणजे अँटिबॉडीजचं जीवनमान आहे, असेही पुढे बोलताना भार्गव यांनी स्पष्ट केले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. एकदा करोनाच्या संसर्गातून बरा झाल्यानंतर रुग्णाला १०० दिवसांनंतर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगात अनेक ठिकाणी पुनर्संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत. भारतात पुनर्संसर्गाची तीन प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी दोन रुग्ण मुंबईतील तर एक अहमदाबादमधील आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here