हा प्रकार पाहून उडेल थरकाप; तीन गाड्या एकमेकांवर, पहा व्हिडीओ

हैद्राबाद :

देशभरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी शेतीपिकांचे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. अशातच मुसळधार बरसणाऱ्या पावसाने हैदराबाद शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे शहरात जीवितहानी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला असून यात एका २ वर्षीय बालकाचाही समावेश आहे.  

आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मंगळवारी पावसाचं तांडव बघायला मिळालं. मुसळधार पावसानं हैदराबादमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून तेलंगणात विविध घटनांमध्ये १४पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनचे अखंड मदतकार्य सुरू आहे. सकाळपासून अंगावर शहारा आणणारी पुराची दृश्ये समोर येत आहेत. अशातच कारचा व्हिडीओ समोर आला आहे.  

उत्तर पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं असून प्रशासनही अलर्टवर आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here