राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; ‘या’ सेवा होणार उद्यापासून सुरू

मुंबई :

अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालू आहे. राज्य सरकारने नवीन परिपत्रक काढत उद्यापासून काही सेवा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. काही दिवसांपासून ग्रंथालये सुरु करण्याची मागणी सातत्याने होत होती. हाच मुद्दा लक्षात घेऊन राज्यातील सर्व ग्रंथालये आणि टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे कंटेन्मेंट झोन बाहेरील आठवडी बाजार सुद्धा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शेतकरी, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमींसाठी या सर्वांना ग्रंथालय, आठवडी बाजार या सेवा सुरु झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.  

राज्य सरकारने राज्यातील सर्व ग्रंथालये १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात परवानगी दिली आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही. पण, शाळेतील शिक्षक वर्गाला ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. याचबरोबर, टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here