हे विचार वाढवतील जगण्याचा आत्मविश्वास; नक्कीच वाचा

 • 1) आपले सत्य-स्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागतात. 
 • 2) स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. 
 • 3) दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात. 
 • 4) प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत. 
 • 5) अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. 
 • 6) अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
 • 7) आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत. त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे. 
 • 8) वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 
 • 9) सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट. 
 • 10) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात.
  मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील! 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here