मला काही झाले तर अक्षय, सलमान, करण जबाबदार असतील; ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

मुंबई :

अभिनय सोडून इतर गोष्टींमुळे सतत चर्चेत असणारा अभिनेता केआरके म्हणजे कमाल खान याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तसेही तो कधी काय बोलेल आणि कुणावर कधी कोणते आरोप लावेल याची अजिबातच खात्री नसते. अशातच अनेक दिवस शांत असलेल्या केआरकेने एक ट्वीट करत आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की, माझ्या जीवाला काही झाले तर त्याला अक्षय कुमार, सलमान खान, करण जोहर व आदित्य चोप्रा जबाबदार असतील.

यावेळी त्याने केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काही वृत्त वाहिन्यांनाही टॅग केले आहे. तो म्हणाला की, मी सर्वांना सांगू इच्छितो की, मला काही झाल्यास त्याला करण जोहर, सलमान खान, साजिद नाडियाडवाला, अक्षय कुमार व आदित्य चोप्रा जबाबदार असतील. कारण या लोकांनी मला संपवण्याचा कट रचला आहे.     

केआरकेने केलेल्या या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. बहुतांश लोकांनी त्याला यावरून ट्रोल केलेलं आहे. केआरके केवळ कंगनाला कॉपी करतोय, तो कंगना राणौतचे ‘मेल व्हर्जन’ आहे, असे युजर्सनी म्हटले आहे. काहींनी तर केआरकेचे ट्विट म्हणजे खूप मोठा विनोद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here