नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार; ‘या’ माजी आमदाराचा गौफ्यस्पोट

जळगाव :

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून नाराज आहेत. त्यांनी ही नाराजी वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे. ते पक्षांतर करणार असल्याच्या वावड्या नेहमीच उठत असतात. मात्र यावेळी खडसेंनीच मनावर घेतल्याने ते पक्षांतर करणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान खडसे यांचे समर्थक असलेले माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी मोठा गौफ्यस्पोट केला आहे. ‘घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील’, असा दावा पाडवी यांनी केला आहे.

‘एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली असून घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यांना राष्ट्रवादीत योग्य मानसन्मान मिळणार असून त्यांच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होणार आहे. तसंच खडसेंना राज्याच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळणार आहे’, असेही पुढे बोलताना पाडवी यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना पाडवी म्हणाले की, सोमवारी नाथाभाऊंना भेटण्यासाठी मुक्ताईनगरला गेलो. यावेळी त्यांना राष्ट्रवादीत जाण्याबाबत काय ठरलं अशी विचारणा केली. त्यावर पॉझिटिव्ह चर्चा झाली. माझ्या मनासारखी चर्चा झाली आहे. येत्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला निश्चितपणे मी प्रवेश करेन. जेव्हा प्रवेश करेन तेव्हा उपस्थित राहावं अशी विनंती तुला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here