पित्ताचा त्रास होतोय; त्यावर हे आहेत घरगुती उपाय

पित्त किंवा ऍसिडिटी हे आजकालची कॉमन समस्य आहे. रात्रभर जगणे, अन्न आहारात वेळोवेळी बदल, खाण्याच्या वेळेत बदल, तसेच इतर ताणतणावामुळे ऍसिडिटी वाढते. बाजारात ऍसिडिटीवर अनेक उपचार आहेत. इनो आहे, सोडा-जी आहे तसेच ऍसिडिटीवर अनेक गोळ्याही मिळतात. परंतु सातत्याने गोळ्या घेणे किंवा ऍसिडिटीवरची पावडर पिणे हे धोकादायक आहे.

आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा त्रास कमी होईल. 

1) आमसूल सरबत प्यावा.

2) अगदी थोडीशी म्हणजे नखाईतकी जेष्ठमध पावडर दुधात प्यावी. 

3) गार दुधात साखर घालून प्यावे त्याने जळजळ कमी होते. पण कफ वाढू शकतो. 

4) अंगावर जे पित्त येते म्हणजे अंगावर मोठमोठ्या गांधी येतात. अशावेळी खायचा सोडा अंगाला लावा. कुठलेही मिश्रण न करता लावा. मग साधारण 25 ते 30 मिनिटांनी अंघोळ करावी. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here