साबुदाणा खाण्याचे असे आहेत आरोग्यदायी ‘फायदे’; वाचा की…

साबुदाण्याचे विविध पदार्थ आपण उपवासाला खात असतो. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे कुरुकुरित वडे आणि इतरही बरेच पदार्थ आपण उपवासाच्या नावाखाली चोपुन खातो. आपल्यापैकी अनेकांना साबुदाण्याचे फायदे माहिती नसतील. दैनंदिन जीवनात असे अनेक पदार्थ असतात, ज्याचे आपल्याला फायदे माहिती नसतात पण जिभेचे चोचले म्हणून आपण ते दणकून खातो. आज आम्ही आपल्याला साबुदाणा खाण्याचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत :-

  • १) साबुदाण्यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मसल्स विकसित होण्यास मदत होते. 

२) साबुदाण्यामध्ये असणारं पोटेशियम रक्त प्रवाह सुरळित ठेऊन, ते नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. 

३) साबुदाणा पचनक्रिया ठिक करुन, गॅस, अपचन आणि इतर समस्यांमध्ये लाभदायक ठरु शकतो.

४) साबुदाणामुळे उर्जा मिळते.

  • साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन-के भरपूर प्रमाणात असतं. जे शरीरातील हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि आवश्यक लवचिकतेसाठी फायदेशीर ठरु शकतं.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here