असा बनवा दर्जेदार ‘शाही मटण कोफ्ता’; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

कोफ्ता हा मुगलाई पाककृतींमधील महत्वाचा प्रकार आहे.ज्यांना दात नाहीत अशा वयोवृद्ध व्यक्तींना मटण खाता यावे,यासाठी तत्कालीन खानसाम्यानी हा प्रकार शोधून काढला,

कबाब आणि कोफ्ता हे भाऊच म्हणावे लागतील,कबाब तळून आणि भाजून खाल्ले जातात तर कोफ्ते ग्रेव्हीसह वाढले जातात.

आज बनवलेले शाही मटण कोफ्ते करताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे,कारण त्यात काजूची पूड वापरली असल्याने तळताना,आणि ग्रेव्हीचा मसाला परतताना आच मंद म्हणजे मंदच ठेवली पाहिजे.

तसंच कोफ्ते फार मोठ्या आकाराचे करायचे नाहीत, कारण ते नंतर रस्सा पिऊन फुलताय म्हणून बेताच्या आकाराचेच करा.

ही काळजी घेतलीत तर या पद्धतीने केलेले कोफ्ते बिघडणार नाहीत याची खात्री मी देते तुम्हाला….

साहित्य घ्या मंडळीहो…

कोफ्त्यासाठी-

 1. 250 ग्रॅम मटण खिमा मिक्सरमधून काढून
 2. 1 मध्यम कांदा उभा कापून,गोल्डन ब्राऊन तळून,कुस्करून
 3. 30 ग्रॅम कोथिंबीर बारीक चिरून
 4. 30 ग्रॅम पुदिना बारीक चिरून
 5. 20 ग्रॅम आले लसूण पेस्ट
 6. 10 ग्रॅम लाल मिरची पूड
 7. 10 ग्रॅम काश्मीरी मिरची पूड
 8. 10 ग्रॅम गरम मसालापूड
 9. 20 ग्रॅम काजू पूड
 10. 5 ग्रॅम जायफळाची पूड
 11. चवीनुसार मीठ

ग्रेव्हीसाठी-

 1. 2 मध्यम कांदे पेस्ट
 2. 1 मध्यम टोमॅटो पेस्ट
 3. 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
 4. 20 ग्रॅम कोथिंबीर बारीक चिरून
 5. 2 तुकडे दालचीनी
 6. 3 लवंगा
 7. 10 काळीमिरी
 8. 1 बडी वेलची
 9. 3 हिरवी वेलची
 10. 1 जावित्री
 11. 5 ग्रॅम शाही जिरे
 12. 20 ग्रॅम काश्मिरी मिरचीपूड
 13. 10 ग्रॅम धणे पूड
 14. चवीनुसार मीठ
 15. 50 ग्रॅम साजुक तूप कोफ्ते आणि ग्रेव्हीसाठी

हे साहित्य घेतले असेल तर करा सुरुवात बनवायला…

 1. कोफ्यांसाठी दिलेले साहित्य एक चमचा तुप घालून एकत्र करून मळून घ्या.
 2. तेलाच्या हाताने समान भाग करुन गोल आकार द्या.
 3. मंद आचेवर कांदा तळलेल्या तेल शॅलो फ्राय करा.उलटताना काळजी घ्या.(मी तेलाचा हात लावून, मायक्रोव्हेव मध्ये पाच मिनिटे शिजवून घेतले)
 4. कांदा तळलेल्या तुपात तूप गळून घेउम हलके तळून घ्या. उलटताना काळजी घ्या.
 5. उरलेले तेल गाळून त्यात ग्रेव्हीसाठीचे खडे गरममसले फोडणीत घाला.
 6. कांदा आणि टोमॅटो पेस्ट घालून दोन मिनिटे परता.मिरचीपूड, धणेपूड, हळदपूड घालून तेल सुटेपर्यंत परतत रहा.
 7. गरम पाणी घालून पातळ करा.छान उकळी येऊ द्या.तळलेले कोफ्ते घालून मंद आचेरवर झाकण ठेवून शिजू द्या.
 8. सात मिनिटांनी कोफ्ते परता.पुन्हा मंद आचेरवर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्या.
 9. दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घाला.दोन मिनिटांनी कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
 10. चपाती,पराठे यांच्यासोबत आस्वाद घ्या.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here