बहुतांशवेळा आपण स्वीट होममधील पदार्थ घरी तयार करण्याचा प्रयत्न करतो परंतु थोडे माप इकडे तिकडे झाले की पदार्थची चव बदलते. आणि पदार्थ फसतो. विविध प्रकारच्या बर्फी बनवताना आपल्याकडून हे नकळत घडते. म्हणूनच आज आम्ही आपल्या घरच्या घरी टेस्टी मिल्क बर्फी कशी बनवायची याविषयी सांगणार आहोत.
साहित्य घ्या मंडळीहो…
- 50 ग्राम मिल्क पावडर
- 1/2 वाटी दुध
- 1 टिस्पुन साजुक तुप
- 3 टिस्पुन साखर
- 2 टेबलस्पून काजु सजावटीसाठी
- 5-6 केशर काप
हे साहित्य घेतले असेल तर करा सुरुवात बनवायला
सुरवातीला कढई मधे तुप टाकावे. तुप वितळल्यावर दुध घालावे आणि मग थोडी थोडी मिल्क पावडर त्यात घालावी आणी ढवळत राहावे. (त्यात गुठळी होऊ नये म्हणून ढवळत राहा)
या मिश्रणात पीठीसाखर घाला मग 7-8 मिनीटात त्याचा गोळा होईल. कढईला चिकटणार नाही.
आता एका ताटलीला तुप लावुन त्यात वरील मिश्रण घालुन पसरवुन बरफीवर काजुचे काप, केशर घालुन 5 मिनीट सेट होण्यासाठी फ्रिज मधे ठेवावी. झाली आपली टेस्टी मिल्क बर्फी तयार….
संपादन : संचिता कदम
- ‘या’ बँकेचा ग्राहकांना अलर्ट! 1 फेब्रुवारीपासून नाही काढता येणार ‘या’ ATM मधून पैसे
- फायद्याची माहिती : म्हणून महाराष्ट्रालाही गरज आहे भावांतर योजनेची; वाचा योजनेचे वैशिष्ट्ये
- ‘त्या’ ई-कॉमर्स वेबसाइटची भन्नाट ऑफर: अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत मिळतोय टीव्ही; स्मार्टफोनवरही 40% डिस्काउंट
- मोठी बातमी : पशूसंवर्धन मंत्र्याचे आव्हान; बर्ड फ्लूमुळे कोणी व्यक्ती दगावल्याचे दाखवून द्या आणि…
- म्हणून पंजाबी शेतकरी आहेत श्रीमंत; पहा कशासाठी नेमके त्यांचे आंदोलन चालू आहे ते