उत्तर पुण्यासह ‘या’ ५ जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी

पुणे :

मौसमी आणि अति पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंत पिक लागण होणे गरजेचे होते मात्र कधीही बरसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणची पिके लागण शेतकऱ्यांनी थांबवली आहे. अशातच राज्यात अजूनही काही ठिकाणी पाऊस होण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वादळी-वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडू शकतो. बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर पुण्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात कोकणासह इतरही ठिकाणी पाऊस सक्रीय राहण्याची शक्यता आहे. तसेच ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता असल्याचा अंदाज मुंबईच्या हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी सांगितला आहे. उत्तर पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं असून प्रशासनही अलर्टवर आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here