धक्कादायक : मुंबईत वीजपुरवठा खंडित होण्यामागे होती ‘ती’ शक्यता; ऊर्जामंत्र्यांचे मोठे विधान

मुंबई : 

मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेवरून राज्यात राजकारण चालू आहे. मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरभागांमधील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे देशाचे अर्थकारण चालवणाऱ्या मुंबईला मोठे नुकसान सोसावे लागले. तसेच महाविकास आघाडीसरकारवर यावरून टीका करण्यात आली. अशातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ‘मुंबई, नवी मुंबईचा वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येणार नाही’, असे विधान केले आहे.

दरम्यान मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल  घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीदेखील त्यांनी चर्चा केली आहे. मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. त्यानंतर मंत्री राऊत यांनी हे घातपाताविषयक विधान केले आहे. या प्रकरणामुळे आधीच कामाला लागलेली यंत्रणा आता आपला तपास राऊत यांच्या विधानामुळे दुसऱ्या दिशेने वळवू शकते.

मुंबईसह उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे बराच काळ लोकल ठप्प होत्या. तर मंत्रालयापासून ते झेरॉक्सच्या दुकानापर्यंत अनेक कामं काही तास रखडली होती. वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर झाला आहे. मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या गाड्या स्थानकांमध्येच काही तास ताटकळत उभ्या राहिल्या होत्या.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here