धक्कादायक! सॅनिटायझरने पेट घेतल्याने ‘राष्ट्रवादी’च्या नेत्याचा गाडीत होरपळून मृत्यू, वाचा, संपूर्ण घटना थोडक्यात

नाशिक :

सॅनिटायझरच्या वापरामुळे अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशातच एक मोठी दुखःद घटना समोर आली आहे. नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे हे सकाळी कारने पिंपळगाव बसवंतकडे निघाले होते. साकोरा फाट्याच्या दरम्यान त्यांच्या कारने पेट घेतला. अचानक लागलेल्या आगीमुळे शिंदे यांना काही समजायच्या आतच आगीचा भडका उडाला. कारचे सर्व दरवाजे आणि काचा बंद असल्यामुळे बाहेर पडणे शिंदे यांना शक्य झालं नाही. यातच संजय शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला.

यानंतर आसपास असलेल्या नागरिकांनी कारच्या पाठीमागील काच फोडली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. आगीने रौद्र रूप धारण केल्याने शिंदे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सॅनिटायझर लवकर आग पकडत असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here