सावधान : ‘त्यो’ व्हायरस किडनॅप करतोय डाटा; रैंसमवेयरने चुकावालय अनेकांच्या काळजाचा ठेका

करोना व्हायरस या जीवाने अगोदरच अवघ्या जगाला घोर लावला आहे. तो मानवनिर्मित की नैसर्गिक हाच राजकीय घोळ मिटलेला नाही. अशावेळी क्रूर विचारांच्या मानवांनी मोबाइलचा डाटा किडनॅप करणारा एक व्हायरस जगभरात सोडून दिला आहे.

हा व्हायरस रैंसमवेयर या कुटुंबातील आहे. मात्र, कुटुंब सोडून इतरांच्या घरात अर्थात मोबाइलमध्ये घुसण्याचा आणि त्यातला महत्वाचा डाटा पळवून नेण्याचा क्रूर छंद या व्हायरसला लागलेला आहे. अँड्रॉइड मोबाइलमध्ये घुसून हा सगळा डाटा पळवत आहे. त्यामुळे मोबाइल वापरणार्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

आपण करोना मला कायकरतोय असे म्हणून बिनधास्त मास्क न लावता आणि हात न धुताच फिरल्यावर जसा करोना घरात येतो. तसाच बेमुर्वत पद्धतीने मोबाइलमध्ये काहीबाही डाऊनलोड केल्यावर आणि काहीही सर्फिंग केल्यावर हा व्हायरस घुसू शकतो.

Microsoft 365 Defender Research यांनी म्हटले आहे की, मोबाइलसह संगणक आणि इतर डिव्हाइसमध्ये घुसून हा डाटा पळवून नेत आहे. त्यावर काहीही औषध अँटिव्हायरस उपलब्ध नसल्याने घालाजी घेणे हाच खरा सध्यातरी उपाय आहे. PhoneArena यांनीही यावर काहीच मात्रा नसल्याने काळजी घेण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here