‘तनिष्क’वाल्यांनी सोडले मैदान; मात्र, चेतन भगत समर्थनासाठी मैदानात; पहा काय सुनावले त्यांनी

भारतात कोणाच्या भावना कशाने दुखतील याचा काहीही नेम नाही. असाच प्रकार आता तनिष्क या दागिन्यांच्या ब्रांडला सहन करावा लागला आहे. ट्रोलर्स मंडळींच्या नादी न लागता अशावेळी तनिष्कवाल्यांनी आपली जाहिरात मागे घेतली आहे. मात्र, सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी अशा विखारी मंडळींना सुनावले आहे.

कंपनीच्या जाहिरातीत एक हिंदू मुलगी मुसलमान कुटुंबात विवाहित होऊन गेल्यावर कौतुकाने तिचे डोहाळे कार्यक्रम करतानाचा प्रसंग आहे. असे धार्मिकतेच्या पलीकडचे विचार न आवडणाऱ्यांना ही जाहिरातही आवडली नाही. मग, आज दुसरे काहीही ट्रोल करायला नसल्याने त्यांनी कंपनीला यावर लक्ष्य केले. कंपनीने मग तोंडाला लागण्यापेक्षा जाहिरात मागे घेतली.

मात्र, तोच धागा पकडून चेतन भगत यांनी म्हटले आहे की, जाहिरातीत काहीही आक्षेपार्ह नाही. ज्यांची आर्थिक क्षमता असे दागिने खरेदी करण्याची नाही अशी मंडळी यावरून ट्रोल करीत आहेत. याच विखारी मंडळींमुळे भारत देशाची आर्थिक स्थिती भविष्यात आणखी खालावेल. नोकरी आणि अर्थव्यवस्था यावर बोलण्याचे सोडून हे असल्या बाबींवर वेळ घालवत आहेत.

त्यावरून काहींनी भगत यांना समर्थन दिले आहे. तर काहींनी ट्रोल करून त्यांना त्यांची ‘लायकी’ दाखवण्याचा ‘महत्वाचा’ प्रयत्न चालवला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here