आम्हाला कुणी ‘त्या’बद्दल शिकवू नये; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

मुंबई :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित विविध मुद्द्यांवरून भाष्य केले. तसेच हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना डिवचले. याच पार्श्वभूमीवर ‘शिवसेेनेचा आत्मा हिंदुत्वाचा आहे. आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही. शिवसेनेला कुणी हिंदुत्वाबद्दल शिकवू नये’, असे म्हणत शिवसेना नेते व खासदार संजय राऊतांनी राज्यपाल कोशारी यांना सुनावले आहे.

संजय राऊत म्हणाले की, ‘ज्यांनी देशात हिंदुत्वाचा वणवा पेटवला. संपूर्ण देश हिंदुत्वमय केला, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उद्धव ठाकरे हे सुपूत्र आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आम्हाला कुणी हिंदुत्वाबद्दल शिकवू नये, त्याचे धडे देऊ नये. आमचे हिंदुत्व पक्के आहे.

राज्यपालांच्या पत्राचे प्रत्युत्तर देत असताना उद्धव ठाकरेही प्रचंड आक्रमक झालेले दिसले. या प्रत्युत्तराच्या पत्रात ठाकरेंनी कोरोना ते कंगना अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांची कानउघणी केली आहे.

तसेच माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही’ अशा शब्दात ठाकरे यांनीही कोश्यारी यांना सुनावले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here