असे बनवा टेस्टी ‘चिकन लपेटा’;वाचा आणि नक्कीच ट्राय करा

चिकन म्हटलं की आधीच आपल्या तोंडाला पाणी सुटलेले असते. त्यातही नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ समोर आल्यावर कधी एकदा त्याची टेस्ट घेईल, असे होते. आज आम्ही अस्सल नॉनव्हेज लवर्ससाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. जिभेचे चोचले किती वाढतील आणि किती पदार्थांवर मेहेरबान होतील याचा काही नेम नाही.

‘चिकन लपेटा’ बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 500 ग्रॅम चिकन
 2. 2 टेबलस्पून दही
 3. 1 कप टोमॅटो प्युरी
 4. 1-1/2 कप कांदा
 5. 2 टीस्पून आले लसूण पेस्ट
 6. 2 टीस्पून लाल मसाला
 7. 1 टीस्पून गरम मसाला
 8. 1/2 टीस्पून हळद
 9. 2 टीस्पून धने जिरे पावडर
 10. 2 टीस्पून कसुरी मेथी
 11. 1/2 कप भाजलेले सुके खोबरे
 12. 10-12 काजू
 13. 1 कप कोथिंबीर
 14. 2 हिरव्या मिरच्या
 15. 1 अंडे
 16. 1/2 कप तेल
 17. 2 वेलची
 18. 1 इंच दालचिनी
 19. 1 कप पाणी
 20. चवीनुसार मीठ

हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघता? करा की सुरुवात बनवायला…

चिकन स्वछ धुवून त्याला मीठ, दही, आले लसूण पेस्ट, 1टीस्पून धने जिरे पावडर, हळद 1 टीस्पून लाल मसाला, 1टीस्पून कसुरी मेथी टाकून मिक्स करून 1/2 तास मॅरीनेट करत ठेवा. आता खोबरे, काजू, मिरची-कोथिंबीर ची पेस्ट करून घ्या. आता मॅरीनेट केलेले चिकन फ्राय पॅन मध्ये थोडे तेल टाकून फ्राय करा.(दोन्ही बाजु प्रत्येकी 6-7 मिनिटे फ्राय करा.)

आता दुसऱ्या भांड्यात 2 टेबलस्पून तेल टाका तेल चांगले तापले की त्यात वेलची व दालचिनी तुकडा टाका.त्याचा सुगंध सुटला की त्यात कांदा टाकून गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या. मग त्यात मसाले टाकून चांगले परतवा. आता त्यात टोमॅटो प्युरी टाकून तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.

आता तयार पेस्ट टाकून 2 मिनिटे परतवा. त्यामध्ये1 कप पाणी टाकून घ्या चवीनुसार मीठ टाका आपण चिकन ला पण मीठ लावले होते त्यामुळे मीठ जरा जपूनच टाकावे

आता तयार ग्रेव्हीत फ्राय चिकन टाकून मिक्स करा.5 मिनिटे उकळी येऊ द्या. आता वरून कसुरी मेथी टाकून मंद आचेवर झाकण ठेवून 1 मिनट ठेऊन गॅस बंद करा. आता ऑम्लेट साठी एका बाऊल मध्ये मीठ टाकून त्यात अंडे फोडून टाका व चांगले फेटा. तव्यावर तेल टाकून तेल तापलं की त्यात फेटलेलं अंड टाका व पातळ ऑम्लेट कडून घ्या.

आता ऑम्लेट चे फोटोत दाखवल्या प्रमाणे तुकडे करा व त्याचा रोल करून घ्या. तयार चिकन सर्व्हिंग बाऊल मध्ये घ्या व त्यावर ऑम्लेटचे रोल ठेवा. चपाती, रोटी किंवा भाकरी सोबत आस्वाद घ्या.

संपादन :संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here