म्हणून रोहित पवारांनी केले मनसे नेते अमित ठाकरेंचे कौतुक; वाचा, काय आहे विषय

अहमदनगर :

आरेतील मेट्रो कारशेड प्रकरणावरून भाजपच्या नेत्यांनी अनेक सवाल उभे केले असताना मनसे नेते अमित ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. मनसेच्या या भूमिकेचे राष्ट्रवादीने स्वागत केले आहे. ‘आमच्या वास्तव भूमिकेवरही मोठं होण्यासाठी बोलत असल्याची टिका करणारे आणि सरकारला केवळ विरोधासाठी विरोध करणारे नेते विरोधी पक्षात भरपूर आहेत, पण सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला’, असे म्हणत युवा आमदार रोहित पवार यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणावरून अनेक सवाल उभे केले होते. विरोधी पक्षांनी आकडे, आर्थिक नुकसान, राजकीय अहंकार असे अनेक मुद्दे घेऊन आरे कारशेडच्या निर्णयाला विरोध केला होता. असे असले तरी मनसे नेते अमित ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ भूमिका घेत म्हटले की, मुंबईचं आणि भावी पिढीसाठी गरजेचं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं परवडेल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here