म्हणून शिवसेनेला आहे अग्निपरीक्षा देण्याची गरज; भाजप नेत्याचा हल्लाबोल

मुंबई :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित विविध मुद्द्यांवरून भाष्य केले. याच पार्श्वभूमीवर या पत्राचे प्रत्युत्तर देत असताना उद्धव ठाकरे प्रचंड आक्रमक झालेले दिसले. ‘माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही’ अशा शब्दात ठाकरे यांनी कोश्यारी यांना सुनावले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ‘काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसल्यानंतर तुम्हाला तर अग्निपरीक्षा देण्याची गरज आहे’, असे म्हणत शिवसेनेवर टीका केली.

भातखळकर म्हणाले की, केरळात गाय कापणाऱ्या, झाकीर नाईककडून डोनेशन घेणाऱ्या, दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या आणि अशी अनंतपापे करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसल्यानंतर तुम्हाला तर अग्निपरीक्षा देण्याची गरज आहे.

मंदिरा आधी दारुची दुकाने व बार सुरू करून मुख्यमंत्र्यांनी आपली प्राथमिकता स्पष्ट केली आहे. महामहिम राज्यपालांनी मंदिराबाबत पत्र लिहून त्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले आहे.सणवार आले आहेत आता तरी शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व आठवून मंदिरे उघडा नाही तर जनता उठाव करेल, असाही इशारा पुढे बोलताना भातखळकर यांनी दिला.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here