मुंबई :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला प्रत्युत्तर देत ‘माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ‘राज्यपालांसमोर पिळतात मिशा आणि जनपथ समोर उठाबशा’ असा धनुष्य बाणवाल्यांचा बाणा आहे, असे म्हणत भाजपवर जळजळीत टीका केली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर दिलं आहे. यामध्ये कोरोना ते कंगना अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांची कानउघणी केली आहे. यावरून पुढे बोलताना भातखळकर म्हणाले की, ‘आपले इंग्रजीत लिहिलेले पत्र मिळाले’… असा टोमणा महामहिम राज्यपालांना मारण्याआधी उद्धवजींनी आदित्य ठाकरे यांना ऐकवला असता तर बरे झाले असते. त्यांचे ट्विट बरेचदा इंग्रजीतच असतात. ‘केम छो वरळी’ची पोस्टर जनता अजून विसरलेली नाही.
संपादन : स्वप्नील पवार
- फायद्याची माहिती : म्हणून महाराष्ट्रालाही गरज आहे भावांतर योजनेची; वाचा योजनेचे वैशिष्ट्ये
- ‘त्या’ ई-कॉमर्स वेबसाइटची भन्नाट ऑफर: अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत मिळतोय टीव्ही; स्मार्टफोनवरही 40% डिस्काउंट
- मोठी बातमी : पशूसंवर्धन मंत्र्याचे आव्हान; बर्ड फ्लूमुळे कोणी व्यक्ती दगावल्याचे दाखवून द्या आणि…
- म्हणून पंजाबी शेतकरी आहेत श्रीमंत; पहा कशासाठी नेमके त्यांचे आंदोलन चालू आहे ते
- 2 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ; वाचा काय आहेत ताजे दर