तंबाखू, गुटखा सोडायचाय, ‘हा’ आहे उपाय; नक्की वाचा आणि शेअर करा

व्यसन म्हणजे कुठल्याही गोष्टीत असलेले सातत्य. आणि माणूस हा सवयीचा गुलाम असतो. त्यामुळे अनेकांना व्यसन सोडायची इच्छा असते मात्र ते सुटत नाही. आज आम्ही तुमचे व्यसन सोडवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. गुटखा व तंबाखूचे सेवन करणारी तरुणाई आपल्याकडे दिसते. तसेच अनेक जुन्या महिलाही तंबाखु खाताना आपल्याला दिसतात. यामुळे महाभयंकर आजार पसरण्याची शक्यता असते. लोक व्यसनमुक्ती केंद्रात जातात अनेक प्रकारची औषधे खातात पण व्यसन काही सुटत नाही अशी परिस्थिती आहे. हा आहे उपाय :-
1) आल्याचे बारीक, बारीक तुकडे करावे. 

2) आल्याचे तुकडे हे उन्हामध्ये काहीकाळ ठेवावे. 

3) जेव्हा ते आले सुकले आहे असे वाटेल तेव्हा ते एका एका छोट्याशा पाउचमध्ये ते ठेवावे. 

4) जेव्हा जेव्हा तंबाखु किंवा गुटखा असे काही खायची इच्छा होईल तेव्हा त्या आल्याचा एक तुकडा तोंडामध्ये टाका. असे नित्यनियमाने करत राहा. याचा परिणाम होईल. सुरवातीला थोडेसे अवघड वाटेल पण नंतर सवय झाल्यावर काहीच वाटणार नाही. किमान 2 महिने हा प्रयोग केल्यास आपले व्यसन नक्कीच सुटेल.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here