डोळ्याच्या तक्रारींनी त्रस्त आहात, ‘हे’ आहेत घरगुती उपाय

डोळे हा शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. डोळे बोलके असतात, म्हणूनच तर डोळ्यांवरून, डोळ्यांच्या लकबी, हावभाव यावरून माणसांना ओळखतात. म्हणूनच तर आपण बेरक्या डोळ्याचा, बिलींदर डोळ्याचा, करारी डोळ्यांचा असे विशेषण डोळ्यांवरून माणसांना देत असतो. या डोळ्यांच्या काळजीसाठी आणि होत असलेल्या दुखण्यासाठी काही घरगुती उपाय :-
१) डोळे चिकटणे :- शुद्ध एरंडेल तेल गरम करून काजळासारखे डोळ्यात घालावे. तेल आणून प्रथम त्याला एक उकळी द्यावी व गार झाल्यावर गाळून बाटलीत भरावे.तसेच डोळयात घाण येत असल्यासही एरंडेल तेलच काजळासारखे डोळयात घालावे.
२) डोळे लाल होणे/ खाजणे :- दुधात पातळ कापड अथवा कापूस बुडवून त्याच्या घडया बंद डोळयांवर ठेवाव्यात.
३) रांजणवाडी – खारीक बी पाण्यात उगाळून त्याचा लेप रांजणवाडीवर लावावा. ८ दिवस हा उपचार करावा.
४) डोळयात काही गेल्यास – भांड्यात स्वच्छ पाणी घेउन त्यात पापण्यांची उघडझाप करावी. तरीही निघत नसेल तर कापूस ओला करून डोळे उघडून डोळयात गेलेला कण बाहेर काढा.
५) डोळयांची जळजळ थांवण्यासाठी पिकलेल्या केळयाच्या सालीची आतील बाजू डोळे बंद करून त्यावर ठेवावी.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here