मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना सुनावले; ‘ते’ मला शिकण्याची गरज नाही, वाचा काय आहेत पत्रातील मुद्दे

मुंबई :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित विविध मुद्द्यांवरून भाष्य केले. तसेच हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना डिवचले. याच पार्श्वभूमीवर या पत्राचे प्रत्युत्तर देत असताना उद्धव ठाकरे प्रचंड आक्रमक झालेले दिसले. या प्रत्युत्तराच्या पत्रात ठाकरेंनी कोरोना ते कंगना अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांची कानउघणी केली आहे.

तसेच माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही’ अशा शब्दात ठाकरे यांनी कोश्यारी यांना सुनावले.

ठाकरे यांनी पत्रात मांडलेले मुद्दे :-

१)       माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. 

२)      ave you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?

३)      करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here