…तर मी भाजपात प्रवेश करेन; कन्हैय्या कुमारचा यल्गार

पटना :

देशाच्या राजकीय पटलावर सध्या बिहार निवडणुक चर्चेत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे युवा नेते कन्हैय्या कुमार यांनी ‘ज्योतिरादित्य शिंदे हे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते अतिशय वाईट व्यक्ती होते. त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हा पासून ते भाजपाचे झाले. मी एके ठिकाणी बोललो आहे की मला जर तुम्ही सतत देशद्रोही-देशद्रोही म्हणाल… तर मी बोलेन की खबरदार… जर जास्तच बोललात तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन’, असे म्हणत भाजपवर टीका केली.

बिहार निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून ते मैदानात उतरले आहेत. कन्हैया कुमार हे सोमवारी बगूसराय जिल्हयातील बखरी विधानसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार सूर्यकांत पासवान आणि तेघडा येथील उमेदवार रामरतन सिंह यांचे नामांकन भरताना उपस्थित होते. नामांकनानंतर कन्हैया कुमार यांनी आयोजित सभेत भाजपावर हल्लाबोल करत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

पुढे बोलताना कन्हैय्या कुमार म्हणाले की, पूर्वी ईव्हीएम हॅक होत होते, आता तर भाजपाचे लोक मुख्यमंत्र्यांनाच हॅक करत आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here