केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना लसीबद्दल दिली महत्त्वाची माहिती; वाचा, काय म्हटलंय त्यांनी

दिल्ली :

कोरोनाची लस कधी येणार, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. जगभरात अनेक ठिकाणी लसीवर संशोधन चालू आहे. तसेच काही ठिकाणी ट्रायल ही केली जात आहे. भारतात बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. २०२१च्या सुरुवातीला लस येण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महत्वाची माहिती दिल्ली आहे. ते म्हणाले की,  आपल्याकडे एकापेक्षा जास्त कंपन्याकडून पुढील वर्षाच्या सुरूवातीलाच लस येण्याची आम्हाला अपेक्षा आहे. देशात लसीचे वितरण कसे करावे, याविषयी योजना तयार करण्यासाठी तज्ज्ञांचा गट धोरण ठरवत आहे.  

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौमय्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, कोरोना लस २०२० च्या अखेरीपर्यंत नोंदणीसाठी तयार होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की, आमच्याकडे सध्या ४० लस आता क्लिनिकल ट्रायल्सच्या टप्प्यात आहे. यापैकी १० लशी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. ज्या लस चाचण्या शेवटच्या टप्प्यात आहे. ते आम्हाला आपल्या लसीच्या कार्यक्षमता व सुरक्षितता याविषयी सांगतील.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here