केशव उपाध्येंच्या ‘त्या’ पोस्टवर सपकाळांचे तडाखेबाज उत्तर, वाचा, राजकीय जुगलबंदी

मुंबई :

‘ना धोरण ना दिशा नुसत्याच गप्पा’, असे म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी  सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र टीका करण्याच्या  या प्रयत्नात ते स्वतःच ट्रोल झाले. उपाध्ये यांनी केलेल्या या ट्वीटवर ‘ना धोरण ना दिशा… निस्ताच वाढवल्यात दाढी मिशा’, असे तडाखेबाज प्रत्युत्तर कॉंग्रेसच्या अभिजित सपकाळ यांनी दिले. नंतर सपकाळ यांचे ते प्रत्युत्तर सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

उपाध्ये यांनी केलेल्या ट्वीटवर विविध प्रतीक्रिया आलेल्या आहेत. यातील बहुतांशी प्रतिक्रिया या भाजपविरोधी आहेत. उपाध्ये यांच्या ट्वीटवर आलेल्या काही मोजक्या प्रतिक्रिया पुढे :-

ओंकार थोरबोले :- साहेब ते गटारी पासुन गॅस बनवायच्या प्रयोगाला नोबेल साठी कधी नोमिनेट करायचे तेवढेच तुम्हाला पोस्टर लावायला एखादा मुद्दा मिळेल!!! बाकी टरबाईन थियरी नी तर जगभरात आपण “अडाणी आहोत” हे माहीत झालेच आहे

सुनील वाली :- काय करणार केंद्र सरकार नाही सुधारणार ! तुम्हाला पण खंत वाटत असेल ना केंद्र सरकारच ना धोरण ना दिशा नुसत्याच फेकु गप्पा !

अमोल कदम :- मोदी लस कशी बनवणार ते सांगता का टीव्हीवर येऊन… 2 हाना पण मला प्रवक्ता म्हणा

अमित खरात :- खरय पण पंतप्रधानांना असे म्हणणे शोभते का

अनिकेत मोरे :- डेरिंग बघ की दादा, इथे पक्षातले वरीष्ठ लोक शेठजी ना घाबरतात नजर मिळवायला ह्यांनी तर डायरेक्ट टोमणा मारला त्यांना, डेरिंग है बॉस   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here