‘तिथे’ बुडण्याआधी बिहारमध्ये प्रॅक्टिस करून घ्या; ‘त्या’ पक्षांना महाराष्ट्र भाजपचा सल्ला

मुंबई :

देशाच्या राजकीय पटलावर बिहार निवडणूक चर्चेत आहे. महाराष्ट्रातून महाविकास आघाडीत एकत्र आलेले पक्ष आणि विरोधात असणारा भाजपही बिहार निवडणूक लढवणार आहे. बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर ‘बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रात बुडण्याआधी बिहारमध्ये प्रॅक्टिस करून घ्या’ असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया भाजपकडून नेहमीच येत असतात. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून काही भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सातत्याने केलेली आहे. अशातच भातखळकर यांनी केलेले हे ट्वीट सूचक आहे. मात्र या ट्वीटवर आलेल्या प्रतिक्रिया जनतेच्या मनातील खरे चित्र दाखवत आहेत. सी.एस. शिरगावकर यांनी म्हटले आहे की, एवढाच अति-आत्मविश्वास असेल तर बिहारमध्ये स्वबळावर निवडणुक लढवून दाखवा. कशाला जदयु सोबत आघाडी करता? आहे का हिम्मत स्वबळावर लढायची? शत प्रतिशत भाजप बासनात गुंडाळून ठेवल का?

संपादन : स्वप्नील पवार

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here