चंद्रकांत पाटील पुन्हा बापावरून बोलले; ‘त्यांच्या’ बापाची पेंड आहे का?

पुणे :

शेतकऱ्यांकडून फक्त सेस गोळा करण्यासाठी होत या कृषी विधेयकाला विरोध होत आहे. राज्य सरकारने कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर देखील शेतकऱ्यांकडून सेस गोळा केला जाईल, असे जाहीर केले. यांच्या बापाची पेंड आहे का? असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाव न घेता हल्लाबोल केला.

दोनच दिवसांपूर्वी  ‘पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत’, असा जिव्हारी लागणारा पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवारांना हाणला होता. त्यानंतर काल भाजपतर्फे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंडपासून चौफुल्यापर्यंत एका ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी विधेयकांचं समर्थन करण्यासाठी आणि ही विधेयके शेतकऱ्यांना कशी फायदेशीर आहेत हे सांगण्यासाठी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप भाषणात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना पुन्हा डिवचले.

स्पष्टवक्ते आणि कुणाचीही भीडभाड न ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाटील यांच्या या टीकेला कसे उत्तर देतात, याकडे राज्याच्या वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here