गायीच्या शेणापासून बनवलेली चिप लॉन्च; वाचा, काय केलाय दावा

दिल्ली :

गायीच्या शेणापासून तंत्रज्ञानासबंधित एखादी चीप बनू शकते, हे वाचून आश्चर्य वाटलं ना? पण होय हे खरं आहे. गायीच्या शेणापासून तयार झालेली चीप दिल्ली येथे राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया यांनी लॉन्च केली आहे. यावेळी त्यांनी दावा केला आहे की, या चिपमुळे मोबाईलमधून पसरणारे रेडिएशन कमी होतात.

यावेळी त्यांनी गायीच्या शेणापासून बनवलेले ईतरही काही उत्पादनं लॉन्च केली आहेत. कथिरिया यांनी सांगितल्याप्रमाणे असे आहेत चीपचे फायदे आणि वैशिष्ट्ये :-

गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेली चिप तुम्ही मोबाईलमध्ये ठेवू शकता. यानंतर तुमच्या मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचं प्रमाण अतिशय कमी होतं.

आजारांपासून दूर राहायचं असल्यास ही चिप अतिशय प्रभावी ठरेल,’ असं कथिरिया यांनी सांगितलं.

या चिपला गौसत्व कवच असं नाव देण्यात आलं असून त्याची निर्मिती राजकोटमधील श्रीजी गौशाळेकडून केली जाते. अधिक माहिती देताना कथिरिया यांनी सांगितले की, ‘मी दररोज गोमूत्र प्राशन करतो, असं अक्षय कुमारनं म्हटलं होतं, हे कदाचित तुम्हाला आठवत असेल. वैद्यकीय कारणांमुळे गोमूत्र प्राशन करत असल्याचं अक्षय म्हणाला होता. आयुर्वेदिक औषधांचे विविध फायदे आहेत. मात्र आपण ते विसरले आहोत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here