पकडलं तर खरं, पण आता दंड कशाचा लावायचा? पोलिसांना पडला प्रश्न; वाचा काय घडलाय प्रकार

रायपुर :

सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीला पकडल्यावर कुठला ना कुठला दंड लावून पोलीस आपल्याला सोडणार, या भीतीने माणसाची गाळण उडते. पण आता छत्तीसगडमध्ये एक भयंकर हास्यास्पद प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला पकडले तर आहे पण लक्षात येत नाहीये की या व्यक्तीला नेमका दंड कुठल्या प्रकारामध्ये लावायचा?

छत्तीसगडचे एसपी संतोष सिंग यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक गाडी आहे, ज्याला सायकल म्हणावं, बाईक म्हणावं की ट्रक म्हणावा असाच प्रश्न हा फोटो पाहून प्रत्येकाला पडत असेल.

खरं पाहता ही एक सायकल आहे परंतु तीला स्टेअरिंग आहे, सायलेन्सर आहे. तसेच सायकलच्या मागे रॉयल इनफिल्ड असं लिहिलं आहे. गाडीच्या मागे बोली भाषेत पाटीही लिहिली आहे. ज्यावर लकी द ग्रेट असं लिहिलं आहे.

हा फोटो शेअर करताना संतोष सिंग यांनी ट्वीट केलं आहे, पकडलं खरं, उल्लंघनदेखील अनेक गोष्टींचं आहे. मात्र आता हे समजत नाही आहे की नेमका चालान कशाचं कापायचं. ट्रकचं, बाईकचं की सायकलचं. की या आविष्कारासाठी यांचं अभिनंदन करायचं. या तरुणाचं त्यांनी कौतुकही केलं आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here