Amazon, Flipkartला टक्कर देणार ही मोठी कंपनी; Youtube वरही विकल्या जाणार वस्तू; वाचा, काय आहे प्रकार

दिल्ली : 

सध्या Amazon आणि Flipkart मोठ्या ताकदीने ई-कॉमर्स क्षेत्रात वेगवेगळे बदल करत आहेत. सध्या मार्केटमध्ये त्यांच्याशी टक्कर घेणारा प्लेयर आला तरी टिकणे शक्य नाही, इतकी विश्वासहर्ता या दोन्ही ई-कॉमर्स कंपन्याने कमावली आहे. मात्र गुगल सारखी कंपनी यांच्या तोडीस तोड देणार आहे.

Google आपल्या जगातील सर्वात मोठी व्हिडिओ साईट प्लॅटफॉर्म Youtubeला शॉपिंग हब बनवण्याची तयारी करत आहे. याद्वारे क्रिएटर्सला Youtube सॉफ्टवेयरचा वापर करून आपल्या क्लिपमध्ये प्रोडक्ट फिचरला टॅग आणि ट्रॅक करण्याचं सांगितलं आहे. त्यानंतर डेटा एनालिटिक्स आणि शॉपिंग टूलद्वारे Googleच्या पॅरेंट कंपनीला लिंक करण्यात येणार आहे. अवघ्या एका क्लिकवर तुम्ही खरेदी शकणार आहात.

YouTube सर्वात कमी उपयोग केली जाणारी संपत्ती आहे. अशात YouTubeमध्ये गुंतवणूक केल्यास, त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. YouTube यातून रेव्हेन्यू कसा जनरेट करेल, याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही, अशी माहितीई-कॉमर्स स्टार्टअप बास्केटचे अध्यक्ष Andy Ellwood यांनी दिली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here