भाजप नेत्याचा सवाल; ‘ते’ न झाल्यामुळे रोज होणाऱ्या 5 कोटीच्या नुकसानीला जबाबदार कोण?

मुंबई :

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणावरून अनेक सवाल उभे केले आहेत. भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ‘आरे कारशेड साठी खर्च झालेल्या 400 कोटींचे आणि तिथे कारशेड न झाल्यामुळे रोज होणाऱ्या 5 कोटीच्या नुकसानीला जबाबदार कोण?’, असा रोखठोक सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

महाविकास आघाडीच्या तज्ञ समितीने दिलेला अहवाल मुख्यमंत्री कोणत्या आधारावर फेटाळतायत?, असाही प्रश्न भातखळकर यांनी पुढे बोलताना उपस्थित केला. दरम्यान ज्यांच्या काळात हे काम सुरु झाले होते ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावरून आक्रमक झाले आहेत. ‘आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून’ घेतला गेला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले आहे. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here