अमित ठाकरेंनी केली मुख्यमंत्री ठाकरेंकडे ‘ही’ मागणी; वाचा, काय आहे विषय

मुंबई :

जर तुम्ही मॉल उघडता तर मंदिरे-ग्रंथालये उघडली गेली पाहिजेत. मुंबई- महाराष्ट्र पुन्हा उघडला गेला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना माझ्यापेक्षा जास्त माहीत असणार. पण मला वाटतं की साडेपाच महिने महाराष्ट्र बंद ठेवल्यानंतर, राज्य आता हळूहळू उघडलं पाहिजे, अशी भूमिका मनसे नेते अमित ठाकरेंनी मांडली आहे. यावेळी त्यांनी ‘टप्प्याटप्प्याने सगळं चालू केलं पाहिजे पण आता चालू करा’, अशीही मागणी यावेळी अमित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टर्स-नर्सेस-विद्यार्थी-आशा वर्कस यांचे प्रश्न सोडवणे ही काळाची गरज होती. हे घटक इतकं काम करीत होते, त्यांचे प्रश्न सोडवणे मला महत्त्वाचे वाटले. मी अलीकडच्या काळात मीडियासमोर आलो नाही, पण माझं काम थांबलं नव्हतं. 

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणावरून अनेक सवाल उभे केले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ भूमिका घेत म्हटले की, मुंबईचं आणि भावी पिढीसाठी गरजेचं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं परवडेल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here