आरे कारशेड प्रकरणी मनसेने मांडली ‘ही’ भूमिका; वाचा, काय म्हटलंय अमित ठाकरेंनी

मुंबई :

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणावरून अनेक सवाल उभे केले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ भूमिका घेत म्हटले की, मुंबईचं आणि भावी पिढीसाठी गरजेचं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं परवडेल.

‘आरे कारशेड साठी खर्च झालेल्या 400 कोटींचे आणि तिथे कारशेड न झाल्यामुळे रोज होणाऱ्या 5 कोटीच्या नुकसानीला जबाबदार कोण?’, असा रोखठोक सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला होता.

कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले आहे. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला होता. हे लक्षात घेत अमित ठाकरेंनी आर्थिक नुकसानाविषयी भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here