‘या’ महिन्यात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल; ‘या’ पक्षप्रमुखाचा दावा

मुंबई :

देशाच्या राजकीय पटलावर बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच ‘केंद्राने परवानगी दिल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप मंदिरे सुरू केली नाहीत. केंद्राची भूमिका राज्य सरकारविरोधी असल्याचे सांगत, डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल’, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळसाहेब आंबेडकर यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या देशात बिहार विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्वांचे लक्ष या निवडणूक प्रक्रियेकडे आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात बिहारमधील निवडणुकांनंतर राष्ट्रपती राजवट लागू होईल. राज्य सरकारची भूमिका केंद्र सरकारविरोधी आहे. कृषी विधयेक आणि मंदिर उघडण्यासारखे केंद्राचे निर्णय राज्य सरकारने धुडकावले आहेत. राज्यघटनेनुसार राज्याला केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जात येत नाही. पण, महाविकास आघाडी सरकार केंद्रविरोधी भूमिका घेत आहे.

दरम्यान रविवारी हाथरस येथील पीडित कुटुंबाची बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणाविषयी भाष्य केले. त्यांनी म्हटले आहे की, हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणे आवश्यक आहे. सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here