भाजप प्रवक्त्याचा आरोप; ‘तो’ निर्णय निर्णय फक्त अहंकार सुखावण्यासाठीच नाही तर…

मुंबई :

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणावरून अनेक सवाल उभे केले आहेत. ‘आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून घेतला गेला’ असल्याची टीका विरोधीपक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटले आहे की, अरे कॉलनी मधील प्रस्तावित मेट्रो कार शेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय फक्त अहंकार सुखावण्यासाठीच नाही तर तो एका फार मोठ्या कारस्थानाचा भाग असु शकतो.

आरे मेट्रो कार शेड प्रकरणावरून भाजप प्रचंड आक्रमक झालेली दिसत आहे. कालही भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ‘आरे कारशेड साठी खर्च झालेल्या 400 कोटींचे आणि तिथे कारशेड न झाल्यामुळे रोज होणाऱ्या 5 कोटीच्या नुकसानीला जबाबदार कोण?’, असा रोखठोक सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला होता. यापैकी कुणाच्याही टीकेला अथवा प्रश्नांना उत्तर दिलेले नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here