कायम डोक्यात अंधार असल्यासारखी जातीवादी वक्तव्य करणारे ‘ते’ मंत्री ग्रीड फेल गोंधळाबाबत बोलतील का?

मुंबई :

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्यावरून समाजमाध्यमांवर महाविकास आघाडी सरकारला ट्रोल करण्यात येत आहे. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावरून मविआ सरकारवर टीकेची राळ उठवली आहे. ‘ग्रीड फेल विषयातील तज्ञ, कायम डोक्यात अंधार असल्यासारखी जातीवादी वक्तव्य करणारे, राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आजच्या ग्रीड फेल गोंधळाबाबत काही स्पष्टीकरण देतील का?’, असा सवाल भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

दरम्यान तासाभरापूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘पनवती’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांना डिवचले. राणे म्हणाले की, काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे !! बसल्या पासुन .. जे कधी नाही ते सगळ होत आहे .. आता काय फक्त डायनासोर आणि एलियन दिसायचे राहिले आहेत.. ते ही दिसतील कदाचीत.. पनवती!!!

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल  घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीदेखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here