‘त्या’ क्षेत्राबाबत आदित्य ठाकरेंकडून मोठ्या आशा आहेत म्हणत ‘या’ युवक कॉंग्रेसच्या नेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत

मुंबई :

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, देशातील आठ समुद्र किनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’नं गौरविण्यात आलं आहे. ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देऊन या किनाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ‘दुर्दैवानं यात महाराष्ट्रातील एकाही समुद्र किनाऱ्याचा समावेश नाही’, असे म्हणत खंत व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून चांगल्या कामाच्या अपेक्षा असल्याचेही सांगितले आहे. ‘दुर्दैवानं आपल्या राज्यात फ्लू फ्लॅगचा अभिमान बाळगावा असा एकही समुद्रकाठ नाहीये. जर आवडीनं त्याचा विकास केला गेला, तर महाराष्ट्राच्या ७५० किमी लांबीच्या किनारपट्टीवर पर्यटन व रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. मला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून मोठ्या आशा आहेत’, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंकडून अपेक्षा असल्याचे सांगतिले.

भारतातील द्वारका, शिवराजपूर, घोघला, कासरकोड, कप्पड, रुशिकोंडा, अंदमान आणि निकोबार या समुद्र किनाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्राला किनारा लाभला असला तरीही एकाही किनाऱ्याला पुरस्कार मिळालेला नाही.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here