सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची मोठी ऑफर; दिवाळीआधीच देणार ‘एवढे’ रुपये

दिल्ली :

सध्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत. कोरोनामुळे काही व्यवसायांचे अतोनात नुकसान झालेले आहे. दिवसेदिंवस देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असल्याचे वृत्त येत आहेत. अशातच केंद्र सरकार विविध योजना राबवून अर्थव्यवस्थेची रुतलेली चाके काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्यासाठी तसेच बाजारातील मागणी वाढण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी ऑफर देऊ केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना LTC कॅश व्हाऊचर आणि फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीम लागू करण्यात आली आहे. प्रवास भत्ता (LTC) चे कॅश व्हाऊचर देण्यात येणार आहेत. हे व्हाऊचर कर्मचारी बाजारात खर्च करू शकणार आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल. या स्कीमचा लाभ पीएसयू आणि सार्वजनिक बँकांच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

याविषयी बोलताना सीतारामण यांनी सांगितले की, एलटीसीच्या बदल्यातील नकदी व्यवहार डिजिटल करता येणार आहे. हा एलटीसी 2018-21 या काळातील असणार आहे. याद्वारे ट्रेन किंवा विमान प्रवास केल्यास करमुक्त असणार आहे. यासाठी कर्मचाऱ्याचे भाडे आणि अन्य खर्च तिप्पट असायला हवा.

याचबरोबर यंदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीम लागू केली जाणार आहे. याद्वारे 10000 रुपयांची अॅडव्हान्स रक्कम सर्व प्रकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाईल. ही रक्कम ते 10 हप्त्यांमध्ये जमा करू शकणार आहेत. ही स्कीम मार्च 2021 पर्यंत उपलब्ध असणार आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here