ब्रेकिंग : भाजपला मोठा धक्का; मोदींच्या आवडत्या ‘त्या’ मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात!

दिल्ली :

NDA तून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडले. एकूणच २ मोठे पक्ष NDA तून बाहेर पडल्याने भाजपला देशपातळीवर मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी सचिन पायलट यांच्या माध्यमातून केलेला कुटाना पण अयशस्वी ठरला. दिवसेंदिवस भाजपला अनेक मोठे धक्के सहन करावे लागत आहेत. अशातच मोदींचे आवडते मुख्यमंत्री अशी ओळख असलेले विप्लब देव यांच्या नेतृत्वात असलेले त्रिपुरा सरकार अडचणीत आलं आहे.

सत्तेत असलेले आमदार मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार घेऊन दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री विप्लब देव यांच्याबाबत अनेक तक्रारी घेऊन ही आमदार मंडळी दिल्लीत पोहोचली आहेत. आता दिल्लीतून कधीही एखादी मोठी राजकीय घडामोड समोर येऊ शकते.

जुन्या नेत्यांच्या मागण्या आणि तक्रारींकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत, तसेच या नेत्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री विप्लब देव हे उदासिन असल्याचा या आमदारांचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराज असलेले काही आमदार आगरताळा येथून दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच आपल्यासोबत न्याय व्हावा आणि मुख्यमंत्र्यांच्या कारभाराला लगाम घालण्यात यावा अशी या आमदारांची मागणी आहे. आता पक्षश्रेष्ठी तरी आपली अडचण सोडवतील, अशी त्यांना आशा आहे. तसेच ते दुसरा पर्याय खुला असल्याचे म्हटले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here