कांदा निर्यातीसाठी ‘त्या’ राज्याला केंद्र सरकारने दिली परवानगी; महाराष्ट्र कॉंग्रेसने केला हल्लाबोल

मुंबई :

केंद्र सरकारने कांदा निर्यातीला घातलेल्या बंदीवरून विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत. अशातच केंद्र सरकारने कर्नाटकातून कांदा निर्यातीसाठी विशेष परवानगी दिल्याची घटना समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते व माजी आमदार भाई जगताप यांनी ‘माझ्या शेतकऱ्याची काय चूक झाली हो मोदीजी?, असा सवाल केला आहे.

तसेच महाराष्ट्र द्रोही आणि माजी मुख्यमंत्री याचे उत्तर देतील का?, असाही सवाल त्यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे. जगताप यांनी केलेल्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. विशाल पाटील यांनी म्हटलं आहे की, कर्नाटक केंद्रा सरकारच्या फेकलेल्या बिस्किटावर जगतो पण आपला महाराष्ट्र हा स्वावलंबी आसल्यामुळ हे आस होत… महाराष्ट्रद्रोही आहेत साले.

दरम्यान या निर्णयानंतर देशातील आणि महाराष्ट्रातील शेतकरी संघटना अधिक आक्रमक होतात का हे पाहणे महत्वाचे आहे. सध्या कृषी विधेयकावरून राजकीय पटलावर जे राजकारण चालू आहे त्यामुळे देशातील राजकीय वातावरण अस्थिर बनलेले आहे. त्यातही वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळा न्याय केंद्राकडून दिला जात आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here