असा बनवा टेस्टी ‘पनीर बटर मसाला’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

पनीर म्हटलं की तोंडाला पाणी सुटलं म्हणायचं… आधीच पनीरची टेस्टी भाजी आणि त्यातही बटर.. वाह क्या बात है… पनीरच्या बऱ्याच भाज्या घरी तयार केल्या जातात. पण काही भाज्या फक्त आपल्याला हॉटेलमध्ये जाऊनच खाव्या लागतात. अशीच एका पनीर भाजीची रेसिपी आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

पनीर बटर मसाला बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 250 ग्रॅम पनीर
 • 2 चमचे बटर आणि दोन चमचे तेल
 • 1 वाटी कांदा
 • 1 वाटी टमाटर
 • 1/2 वाटी कोथिंबीर
 • 1 चमचा लसणाची पेस्ट
 • 1 तमालपत्र
 • 2 लवंगा
 • 2 मोठी विलायची,
 • 2 कलमी
 • 2 लहान विलायची
 • 1 चमचा तिखट
 • 1/2 टीस्पून हळद
 • 1 टीस्पून धने पावडर
 • 1 टीस्पून गरम मसाला
 • प्रमाणात मीठ
 • किंचीत साखर
 • 1 चमचा खसखस
 • 1 टीस्पून जीर
 • 1/2 टीस्पून मोहरी
 • 1 चमचा कसूरी मेथी

आता हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघताय करा सुरुवात बनवायला…

 1. पनीर बटर मसाला बनविण्यासाठी पनीर स्वच्छ धुऊन त्याचे काप करून घ्यावे. कांदा, टोमॅटो कापून घ्यावा. त्यानंतर कांदा, खसखस, तेच पान लवंग, मोठी आणि लहान विलायची, कलमी, जीर कढईमध्ये तेल घालून भाजून घ्यावे.
 2. वरील मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. तसेच टोमॅटो पण बारीक करून घ्यावे. गॅसवर कढईमध्ये तेल आणि बटर गरम करायला ठेवावे. त्यामध्ये मोहरी घालावी.
 3. त्यानंतर आले लसणाची पेस्ट, कांदा खसखसच वाटण आणि टोमॅटोची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावे. त्यानंतर तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी आणि मीठ घालून मिश्रण मिक्स करून घ्यावे. आणि त्यामध्ये पनीरचे काप घालावे. तीन ते पाच मिनिटे मसाल्या मध्ये ते शिजू द्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून, त्याची उकळ काढावी. वरून किंचित साखर घालावी. आणि कोथिंबीर घालावा.
 4. तयार आहे आपली गरमागरम पनीर बटर मसाला.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here