कान दुखतोय; त्यावर ‘हे’ आहेत घरगुती उपाय

अनेक लोकांना कानाच्या छोटमोठ्या समस्या असतात. पण तेवढ्यासाठी दवाखान्यात जायचे असते म्हणून लोक दुर्लक्ष करतात. म्हणूनच आज आम्ही आपल्याला कानाच्या समस्यांसाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. लसूण वापरून तुम्ही कानाच्या समस्यांवर उपाय करू शकतात.
१) लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक करून घ्या.  मग त्या बारीक झालेली पाकळ्या कापड्यात गुंडाळा. त्याचा रस थेट कानाच्या दुखत असलेल्या जागी लावा.
२) लसणाच्या काही पाकळ्या घेऊन ठेचून घ्या. आता हे मिश्रण एका कापड्यात गुंडाळून आपल्या कानावर ठेवा. कमीत कमी अर्धा तास ठेवल्यास आपल्याला त्वरित फरक जाणवेल.
३) लसणाला मिठासह उकळून घ्यावे. मग बारीक ठेचून घ्या.  आता तयार झालेली पेस्ट कानाला किंवा कानाच्या मागील बाजूस लावा. थोड्याच वेळात फरक जाणवायला लागेल.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here