कमी वयात केस झालेत पांढरे, हे आहेत घरगुती उपाय

सध्या कमी वयात केस पांढरे होणे ही कॉमन समस्या झाली आहे. अगदी ९-१० वर्षांच्या मुलापासून तर तरुणांपर्यंत सर्वांचे केस पांढरे असतात. आपली बदलती जीवनशैली, बदललेल्या खानपानपद्धती, तणाव, अपुरी झोप या सर्व कारणांमुळे केस पांढरे होत असतात. आता यावर आम्ही काही घरगूती उपाय सांगणार आहोत, ते केल्यास नक्कीच फरक पडेल. 
१) साधारणपणे मोठ्या वाटीत कढीपत्ता उकळवून घ्या. आणि मग पाणी थंड करायला ठेवा. पाणी थंड/कोमट झाले की प्या. रोज हा उपाय केल्यास नक्कीच बदल जाणवेल. फक्त असे पाणी पिण्यात सातत्य असावे. 

२) एका ग्लासमध्ये लिंबू पिळावे आणि त्यात आवळा पावडर घ्या. चांगले ढवळून घ्या. मग हे मिश्रण प्या. हा उपाय सकाळी करावा. केस तुटणे, केसांना इजा पोचणे आणि केस पांढरे होण्यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते.
३) त्रिफळा चूर्ण केसांसाठी फायदेशीर असते. त्रिफळा चूर्ण केसांना पांढरे होण्यापासून थांबविण्याबरोबरच डॅमेज झालेल्या केसांनादेखील ठीक करते. 
४) रोज रात्री कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून रात्रभर केस तसेच ठेवावे आणि सकाळी डोक्यावरून अंघोळ करावी. त्रिफळा चूर्ण – याच्या सेवनाने नवीन सेल्सच्या निर्मितीसाठी फायदा होऊ शकतो. त्रिफळा चूर्ण केसांसाठी फायदेशीर असते. त्रिफळा चूर्ण केसांना पांढरे होण्यापासून थांबविण्याबरोबरच डॅमेज झालेल्या केसांनादेखील ठीक करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण आणि आवळ्याचे चूर्ण पाण्यात मिसळून सेवन करावे.
५) भृंगराज तेल – हा एक आयुर्वेदिक उपाय असून, केसांच्या सर्व समस्यांवर गुणकारी आहे. केसांना पांढरे होण्यापासून थांबवण्यासाठी हे तेल अतिशय फायदेशीर ठरते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भृंगराज तेल आणि एक चमचा आवळा तेल एकत्र करून केसांना लावावे.
६)  कांदा – केसांना कमी वयातच पांढरे होण्यापासून थांबविण्यासाठी हा गुणकारी घरगुती उपाय आहे. रोज रात्री कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून रात्रभर केस तसेच ठेवावे आणि सकाळी डोक्यावरून अंघोळ करावी. पांढऱ्या केसांच्या समस्येतून मुक्त होण्याबरोबरच केसांच्या वाढीसाठीदेखील मदत होते. सूचना – वरील सर्व उपाय करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here