तर मी राजकारण सोडेन; केंद्रीय मंत्र्यांचे गांधी भावंडांना ‘हे’ आव्हान

दिल्ली :

सध्या कृषी विधेयकाचा मुद्दा देशाच्या राजकीय पटलावर चर्चेत आह. कॉंग्रेसने देशभरात कृषी विधेयकावरून रान पेटवले आहे. या मुद्द्यावर प्रचंड आक्रमक होत कॉंग्रेसने देशभरात आंदोलने केली आहेत. हाथरस आणि कृषी विधेयकावरून राहुल गांधींसह प्रियांका गांधीही आक्रमक होताना दिसल्या. याच पार्श्वभूमीवर ‘राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनी जर एखाद्या पिकाच्या पानावरुन ते पीक कोणतं आहे हे ओळखल्यास मी राजकारण सोडेन’, असं आव्हान केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिलं आहे.

पुढे बोलताना शेखावत यांनी गांधी परिवाराकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला आहे. देशात अनेक नेते शेतकरी आहात की नाही या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करत असतात. एवढेच नव्हे तर कितीतरी शेतकरी संघटनांच्या नेतेसुद्धा शहरातील पार्श्वभूमीचे आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कॉंग्रेसने कृषी कायद्याविरोधात मोठे आंदोलन उभा केले होते. मोदी सरकारचे वादग्रस्त कृषी कायदे आपली सत्ता असणाऱ्या राज्यांत रद्दबातल ठरवण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कृषी कायदेवरून शाब्दिक हल्ला चढवला दिसत आहे.       

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here