स्टेशनरीमध्ये ग्रीप घेण्याचा सेलोचा प्लॅन; तुमची आवडती कंपनी पुन्हा येणार नव्या रंग-ढंगात..!

सेलो ग्रीपर नावाचा किंवा इतर पेन आठवतात का? होय, आता नाही ना भेटत ते पेन मार्केटमध्ये. मात्र, पाच वर्षांपूर्वी त्यांचा मोठा दबदबा होता की. आपल्या त्याच आवडत्या सेलो कंपनीने आता पुन्हा एकदा स्टेशनरी मार्केटमध्ये ग्रीप घेण्याची तयारी केली आहे.

२०१५ मध्ये स्टेशनरीमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या या कंपनीने आपला सेलो पेन नावाचा बिजनेस थेट फ्रान्सच्या कंपनीला विकला होता. त्यावेळी ५४० कोटी रुपयांना हा सौदा झाला होता. त्यामुळे करारानुसार आता ही कंपनी त्याच नावाने पुन्हा बाजारात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी आता नव्या ब्रांड नेमने बाजारात येण्याची घोषणा केली आहे.

सेलो ग्रुपचे (Cello Group) व्यवस्थापकीय संचालक गौरव पी राठोड यांनी म्हटले आहे की, फ्रान्सच्या BIC ग्रुपबरोबर केलेल्या व्यवहाराच्या नियम आणि अटी पाळून आम्ही बाजारात येत आहोत. सध्या ही कंपनी दमन, उत्तराखंड, तमिलनाडु आणि पश्चिम बंगाल येथे उत्पादन करीत आहे. होम अप्लायंसेज, ग्लासवेयर, प्लास्टिक व स्टील हाउसवेयर, एयर कूलर्स, क्लीनिंग प्रॉडक्ट्स आणि फर्नीचर यामध्ये एक बेस्ट कंपनी म्हणून त्यांची ओळख आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here