गुड न्यूज : कृषी निर्यातीने दिला अर्थव्यवस्थेला हात; वाचा महत्वाची बातमी

शेतीआधारीत अर्थव्यवस्था असूनही शेती आणि शेतकरी यांना प्रशासकीय व धोरणात्मक पातळीवर दुय्यम स्थान असलेल्या भारताला आता खऱ्या अर्थाने फ़क़्त कृषी क्षेत्राने तारले आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या संकटामधून बाहेर काढण्यासाठी हेच क्षेत्र देशाला हात देत आहे.

होय, हे काही स्वप्न नाही. हे वास्तव आहे. कारण, मागील तिमाहीत सगळ्या सेक्टरमध्ये मंदी असताना शेतमाल निर्यातीने थेट ४३.४ टक्के इतकी वृद्धी नोंदवली आहे. ५३ हजार ६२६ कोटी रुपयांच्या शेतमालाची निर्यात सप्टेंबरच्या तिमाहीत झालेली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही आनंदाची बातमी दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तर ही वाढ थेट ८१ टक्के इतकी मोठी आहे. जर कांदा आणि कांद्याचे पदार्थ यांच्या निर्यातीला केंद्र सरकारने ब्रेक लावला नसतं तर हीच निर्यात आणखी मोठ्या टप्प्यावर जाऊन पोहोचली असती.

मात्र, आरोग्य, अस्मानी आणि सुलतानी अशा सर्व संकटांवर मात करून देशातील शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. भुईमुग ३५ टक्के, साखर १०४ टक्के, गहू २०६ टक्के, बासमती तांदूळ १३ टक्के, इतर तांदूळ १०५ टक्के अशी वाढ झालेली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here