दिवाळीनंतरही शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण राज्यमंत्र्यांचे मोठे विधान, वाचा, काय म्हटलंय त्यांनी

मुंबई :

अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. अशातच शिक्षण, परीक्षाबाबत अनेक निर्णय घेतले जात आहेत. महाराष्ट्रात दिवाळीनंतर शाळा सुरू होणार असे संकेत काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. मात्र आता शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितले की, दिवाळीनंतरही कोरोनाचे संक्रमण वाढतच राहिल्यास राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करणे अशक्‍यच राहील.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लस मिळाल्याशिवाय शाळा उघडू नये, ही मागणी जोर धरत आहे. आता काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत. मात्र कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती असल्याने अनेक जण ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडत आहेत. महाराष्ट्रात अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठीची बंधने लक्षात घेऊन ऑफलाईनचा पर्याय निवडला आहे.

कदाचित आतापेक्षा कोरोनाचे संक्रमण कमी झाले आणि आपल्याला वाटले शाळा सुरू करायला हरकत नाही तेव्हा शाळा सुरू करता येईल, परंतु आपण जगाचा विचार केला तर ब्रिटनमध्ये 13 हजार विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती पुढे बोलताना कडू यांनी दिली. शाळा सुरु होण्याबाबतच्या सर्व चर्चांना कडू यांनी लगाम घातला आहे.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here