भाजपच्या माजी मंत्र्यांची विखारी टीका; ठाकरे गझनी तर शरद पवार…

पुणे :

राज्याच्या राजकीय पटलावर सध्या कृषी विधेयकाचा मुद्दा चर्चेत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जुंपली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था गझनी चित्रपटातील आमिर खान सारखी झाली आहे. शरद पवार हे पलटी मारणारे नेते आहेत’, असे म्हणत भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था गझनी चित्रपटातील आमिर खान सारखी झाली आहे. दिलेली आश्वासने आता त्यांना आठवत नाहीत का?’, असा सवालही यावेळी बोंडे यांनी केला. पुढे बोलताना बोंडे म्हणाले की, शरद पवार हे पलटी मारणारे नेते आहेत. त्यांनी तर आत्मचरित्रात लिहलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्या नियमनमुक्त झाल्या पाहिजेत.काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांचं सरकार असताना शेती उत्पादनाचा कायदा केला. मग आता ते खोटं का बोलत आहेत?

पुणे जिल्हयातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील किसान संवाद अभियान सभेत बोलत असताना बोंडे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात कृषी कायद्याच्या समर्थनार्थ उल्लेख असल्याचे समोर आले आहे. आता मात्र मोदी सरकारच्या काळात हे कृषी कायदे आल्याने पवार त्याला विरोध करत असल्याचा प्रकार समोर आलं आहे. याच कारणाने पवारांना सोशल मिडियावरही ट्रोल करण्यात आलं होतं.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here